Kerala Flood: केरळ येथील पूर गृस्तांना नांदेड वाणिज्य विभागातर्फे 3.15 लाख रुपयांची मदत- इतरांनीही समोर येण्याचे आवाहन

नांदेड – केरळ राज्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील लोकांना मदत करण्याचे आवाहन रेल्वे बोर्ड अध्यक्ष श्री अश्विनी लोहानी यांनी सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना केले आहे. यानुसार नांदेड रेल्वे विभागातील वाणिज्य विभागाने केरळ येथील पूर गृस्तांना 3.15 लाख रुपयांची मदत केली आहे. श्रीमती नेहा रत्नाकर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड यांनी वाणिज्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना केरळ पुरगृस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत केवळ 24 तासात वाणिज्य विभागातील 400 कर्मचाऱ्यांनी 3.15 लाख रुपये जमा करून त्यांच्या कडे सुपूर्द केले. यातून तेथील पूरगृस्तान करिता उपयोगी पडणाऱ्या वस्तू विकत घेवून त्या केरळ येथे रेल्वे ने पाठविण्यात आल्या. यात

1.         400 पाण्याच्या बाटल्या
2.        300 प्लास्टिक मेट्स
3.        100 मिल्क पावडर पाकीट
4.        300 बेडशीट
5.        300 टावेल
6.        300 सेनेटरी नेपकिन
7.        1200 काडी पेट्या
8.        1000 मच्छर रिपेलंट
9.        आणि इतर साहित्य पाठविण्यात आले.

या सर्व कार्यात श्री रवी वर्मा, सहायक वाणिज्य अधिकारी, नांदेड विभाग आणि इतर वाणिज्य निरीक्षक तसेच इतर कर्मचारी यांनी मोलाचे कार्य केले. वाणिज्य विभागातील कर्मचाऱ्यांनी जे कार्य केले त्याबद्दल श्रीमती नेहा रत्नाकर यांनी त्यांचे मनापासून आभार मानले. श्रीमती रत्नाकर यांनी जनतेला आवाहन केले आहे की त्यांनीही पुढे येवून मानवतेच्या दृष्टीकोणातून केरळ येथील पुरगृस्तांना मदत करावी. नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार सध्या केरळ मध्ये पुरगृस्तांना मदती करिता 3274 केम्प लावण्यात आले आहेत. ज्यात 2.63 लाख कुटुंब आणि 10 लाख लोक राहत आहेत. तेथील लोकांना ज्या वस्तूंची गरज आहे त्याची यादी सोबत जोडली आहे. आदरणीय संपादक साहेबांना विनंती आहे हि बातमी आपल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी.

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail