ट्राफिक ब्लॉक मुळे काही सवारी गाड्या उशिरा धावणार

नांदेड़ – उस्माननगर ते सातोना दरम्यान घेण्यात येणाऱ्या ब्लॉक मुळे गाडी संख्या 57541 नगरसोल-नांदेड सवारी गाडी आणि गाडी संख्या57562 मनमाड ते काचीगुडा सवारी गाडी उशिरा धावेल. हा ब्लॉक पाच दिवस, सकाळी 8 ते 11 वाजे पर्यंत घेण्यात येणार आहे. दिनांक 21, 23, 25, 28, 30 ऑगस्ट 2018 रोजी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

या मुळे गाडी संख्या 57541  नगरसोल ते नांदेड सवारी गाडी परतूर रेल्वे स्थानकावर सकाळी 10 ते 11.20 वाजे पर्यंत 80 मिनिटे थांबेल.

तसेच या ब्लॉक मुळे गाडी संख्या 57562 मनमाड ते काचीगुडा सवारी गाडी परतूर रेल्वे स्थानावरच सकाळी 10.43 ते 11.04 अशी 21 मिनिटे थांबेल.

प्रवाश्यांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail