डिजिटल पेमेंट आणि पी.ओ.यस. मशीन चा वापर वाढविण्या विषयी

नांदेड़ – डिजिटल पेमेंट आणि केश लेस अर्थ व्यवस्था विकसित करण्या करिता इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रद्यान मंत्रालय, भारत सरकार प्रयत्न करत आहे. या अंतर्गत जी 100 स्मार्ट शहरे डिजिटल तंत्रज्ञान चा वापर वाढविण्या करिता घोषित करण्यात आली आहेत त्या मध्ये नांदेड रेल्वे विभागातील औरंगाबाद या औद्योगिक शहराचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सर्व प्रथम औरंगाबाद रेल्वे स्टेशन वर 100 डिजिटल पेमेंट ची सुविधा नांदेड रेल्वे विभागाने उपलब्ध करून दिली होती. परंतु, तिकीटिंग वगळता इतर ठिकाणी डिजिटल पेमेंट ची सुविधा म्हणावी तशी वापरली जात नाही.

नांदेड रेल्वे विभाग औरंगाबाद रेल्वे स्थानकावर येणाऱ्या जनतेस विनंती करते कि आपण केश लेस अर्थ व्यवस्था विकसित करण्या करिता डिजिटल पेमेंट चा पर्याय वापरावा.

औरंबाबाद रेल्वे स्थानकावर रिजर्वेशन,तिकीट खीडकी, पार्किंग, हॉटेल, चहाची दुकान, खेळणी ची दुकान, बुक स्टोल, गुड्स शेड, पार्सल ऑफिस, पे अंड युज टोयलेट , तसेच इतर ठिकाणीही केश लेस पेमेंट ची सुविधा पी.ओ.एस. मशीन द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail