धानोरा-बोधडी दरम्यान रेल्वे पटरी वरून पाणी गेल्या मुळे काही गाड्या उशिरा धावणार

नांदेड – आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुदखेड आदिलाबाद सेक्शन  मधील धानोरा ते बोधडी दरम्यान कि.मी. 96/4-5 येथे  रेल्वे पटरी वरून पाणी वाहून गेल्या मुळे एका बाजूची गिट्टी उघडी पडली होती.

सायंकाळ पर्यंत पाणी कमी झाले आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून काही गाड्या विविध ठिकाणी थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही गाड्या उशिरा धावत आहेत तर काही गाड्या उशिरा सोडण्यात  येणार आहेत, त्या पुढील प्रमाणे –

1. गाडी संख्या 57532 आदिलाबाद-पूर्णा सवारी गाडी दिनांक 16 ऑगस्ट ला दुपारी 15.15 वाजता सुटणारी गाडी 180 मिनिट उशिरा म्हणजे 18.15 वाजता सुटेल.

2. गाडी संख्या 17406 आदिलाबाद-तिरुपती एक्स्प्रेस 16 ऑगस्ट ला  रात्री   20.45 ला सुटणारी 135 मिनिटे उशिरा म्हणजे 23.00 वाजता सुटेल.

3. गाडी संख्या 57584 पूर्णा-अकोला 16 ऑगस्ट ला रात्री 22.00 ला सुटणारी 150 मिनिटे उशिरा म्हणजे दिनांक 17 ऑगस्ट ला रात्री 00.30 वाजता सुटेल.

प्रवाश्यांना होणाऱ्या त्रास बद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail