नांदेड आर.पी.एफ. जवानांचा उत्कृष्ठ कार्याबद्दल सत्कार

नांदेड – श्री त्रिकालज्ञ राभा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी आज दिनांक 1 ऑगस्ट 2018 रोजी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आर.पी.एफ.) च्या जवानांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव केला.  या प्रसंगी श्री विश्वनाथ ईर्या, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड, श्री बी.के. पांडे, विभागीय सुरक्षा आयुक्त उपस्थित होते.

दिनांक 27 जुलै रोजी, नांदेड रेल्वे स्थानकावर फलात्फोर्म क्र. 4 वरून  गाडी संख्या 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्स्प्रेस सुटत असतांना श्री देवराव तुकाराम लोने, वय-65 वर्ष हे चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यातच त्यांचा तोल जावून ते फलात्फोर्म वर पडले , गाडी सोबतच 20 फुटा पर्यंत फरफटत गेले  आणि जवळपास रेल्वे गाडी खाली जाणार होते तितक्यात प्रसंग अवधान राखून फलात्फोर्म वर उपस्थित रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आर.पी.एफ.) च्या जवानांनी त्यांना बाहेर ओढले आणि त्यांचे प्राण वाचविले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या त्यावर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आर.पी.एफ.) च्या जवानांनी प्राथमिक उपचार केले.

या वेळी श्री संतोष कुमार, पोलीस उप निरक्षक, श्री नवदीप/ कॉन्स्टेबल, श्री हमीद खान/ कॉन्स्टेबल, श्री संतोष इंगळे / कॉन्स्टेबल यांनी आपल्या कार्याचे आणि मानवतेचे उत्कृष्ठ प्रदर्शन केल्या बद्दल श्री राभा, डी.आर.एम. साहेबांनी त्यांचा गौरव केला.

दुसऱ्या घटनेत दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 04.15 वाजता गाडी संख्या 11205 क्रोस्सिंग करिता पेडगाव रेल्वे स्थानकावर थांबली होती तेंव्हा तीन चोरट्यांनी गाडीच्या जनरल डब्ब्या मध्ये प्रवान्शांकडून मोबाईल आणि पैसे जबरदस्तीने घेतले. तेंव्हा हा गोंधळ पाहून गाडीत असलेल्या रेल्वे पोलिस श्री पवार वी.आर. /कॉन्स्टेबल, श्री जयसिंह चौधरी/कॉन्स्टेबल, श्री नवदीप/कॉन्स्टेबल , श्री अजित पवार/कॉन्स्टेबल, श्री सूर्यवंशी/कॉन्स्टेबल आणि श्री कोहली कॉन्स्टेबल यांनी   त्या चोरांचा पाठलाग केला, त्यांच्या हाती एक चोर सापडला आणि उरलेले दोन चोर अंधाराचा फायदा घेवून पसार झाले.

पकडलेल्या चोराला नांदेड रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आणि उरलेल्या दोघा विरुद्ध हि तक्रार दाखल करण्यात आली. त्यांचा शोध जी.आर.पी. घेत आहे.

पेडगाव रेल्वे स्टेशन वर आर. पी. एफ. च्या जवानांनी जे कार्य केले त्या बद्दल श्री राभा, डी.आर. एम. यांनी त्यांच्या गौरव केला.

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail