महाराष्ट्र बंद च्या हाकेमुळे काही रेल्वे गाड्या रद्द / काही अंशतः रद्द, काही गाड्या उशिराने धावत आहेत

मराठा आरक्षण –महाराष्ट्र बंद च्या हाकेमुळे काही रेल्वे गाड्या रद्द / काही अंशतः रद्द

नांदेड – आज दिनांक 9 ऑगस्ट, 2018 रोजी मराठा आरक्षणा संबंधात महाराष्ट्र बंद आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी रेल्वे गाड्या अडवण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावत आहेत.

विविध जिल्ह्यात्तील परिस्थिती लक्षात घेता प्रवाश्यांच्या सुरक्षे करिता काही रेल्वे गाड्या अशातः रद्द तर काही रेल्वे गाड्या पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे –

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

1. गाडी संख्या 57540 परळी – अकोला सवारी गाडी दिनांक 9.8.2018 रोजी पूर्णतः रद्द.
2. गाडी संख्या 57583 अकोला-पूर्णा सवारी गाडी दिनांक 9.8.2018 रोजी पूर्णतः रद्द.
3. गाडी संख्या 57512 परभणी-नांदेड सवारी गाडी दिनांक 9.8.2018 रोजी पूर्णतः रद्द

अंशतः रद्द

1. गाडी संख्या 57554 आदिलाबाद-परळी सवारी गाडी दिनांक 9.8.2018 रोजी पूर्णा-परळी दरम्यान रद्द
2. गाडी संख्या 57541 नगरसोल-नांदेड सवारी गाडी दिनांक 9.8.2018 रोजी परभणी –नांदेड दरम्यान रद्द
3. गाडी संख्या 57562 मनमाड-काचीगुडा सवारी गाडी दिनांक 9.8.2018 रोजी परभणी ते काचीगुडा दरम्यान रद्द, ह्या गाडीचा रेक गाडी संख्या 57561 बनून परभणी-मनमाड अशी धावेल.
4. गाडी संख्या 57561 काचीगुडा-मनमाड सवारी गाडी दिनांक 9.8.2018 रोजी नांदेड-मनमाड दरम्यान रद्द, ह्या गाडीचा रेक गाडी संख्या 57562 बनून नांदेड-काचीगुडा अशी धावेल.

गाडी संख्या 12766 अमरावती-तिरुपती एक्स्प्रेस वर काही अज्ञात लोकांनी पथराव केला आहे.

नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस चौदावा-पूर्णा दरम्यान 3 तास थांबविली गेली, तसेच नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस आणि अमृतसर-नांदेड सचखंड एस्क्प्रेस ह्या दोन्ही गाड्या औरंगाबाद रेल्वे स्थानकावर 2 तासा पासून थांबून आहेत.

अमरावती –तिरुपती एक्स्प्रेस चुडावा-नांदेड दरम्यान 1 तास थांविण्यात आली.

या मुळे रेल्वे प्रशासनास लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासना तर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते कि सर्वांनी संयम बाळगावा. रेल्वे हि राष्ट्रीय संपत्ती आहे.

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail