विषय-ट्राफिक ब्लॉक मुळे काही सवारी गाड्या उशिरा धावणार

नांदेड – उस्माननगर ते सातोना दरम्यान घेण्यात येणाऱ्या ब्लॉक मुळे गाडी संख्या 57541 नगरसोल-नांदेड सवारी गाडी आणि गाडी संख्या 57562 मनमाड ते काचीगुडा सवारी गाडी उशिरा धावेल. हा ब्लॉक पाच दिवस सकाळी 8 ते 11 वाजे पर्यंत घेण्यात येणार आहे. दिनांक 31 जुलै, 2, 3, 4 आणि 7 ऑगस्ट रोजी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या मुळे गाडी संख्या 57541  नगरसोल ते नांदेड सवारी गाडी परतूर रेल्वे स्थानकावर सकाळी 10 ते 11.20 वाजे पर्यंत 80 मिनिटे थांबेल.

तसेच या ब्लॉक मुळे गाडी संख्या 57562 मनमाड ते काचीगुडा सवारी गाडी परतूर रेल्वे स्थानावरच सकाळी 10.43 ते 11.04 अशी 21 मिनिटे थांबेल.

सेलू ते धेगळी पिंपळगाव दरम्यान घेण्यात येणाऱ्या ब्लॉक मुळे गाडी सख्या 57549  हैदराबाद ते औरंगाबाद सवारी गाडी आणि गाडी संख्या 57541 नगरसोल ते नांदेड सवारी गाडी उशिरा धावेल. हा ब्लॉक 18 दिवस दिनांक 9, 10, 11, 14, 16, 17, 18, 21, 23, 24, 25, 28, 30, 31, 1, 4, 6, 7 सप्टेंबर रोजी रोज 03 तास सकाळी 07.45 ते 10.45 वाजे पर्यंत घेण्यात आहे.

यामुळे गाडी संख्या 57549 हैदराबाद ते औरंगाबाद सावरी गाडी धेंगली रेल्वे स्थानकावर सकाळी 10.35 ते 10.50 वाजे पर्यंत म्हणजे 15 मिनिटे थांबेल.

तसेच गाडी संख्या 57541 नगरसोल ते नांदेड हि सवारी गाडी सकाळी 10.42 ते 11.02 वाजे पर्यंत म्हणजे 20 मिनटे थांबेल.

प्रवाश्यांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

आदरणीय संपादक साहेबांना विनंती आहे हि बातमी आपल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी.

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail