सोलापूर विभागातील रेल्वे कामा मुळे काही रेल्वे गाड्या रद्द तर काही अंशतः रद्द

सोलापूर/नांदेड – सोलापूर विभाग, मध्य रेल्वे, दौंड-मनमाड सेक्शन मध्ये ब्लॉक मुळे आणि रेल्वे पटरी दुरुस्तीच्या कामामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाश्यांना होणाऱ्या असुविधे बद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

1) गाडी संख्या 51421 पुणे ते निझामाबाद सवारी गाडी – दिनांक 02.08.2018 ते 30.09.2018  दरम्यान रद्द

2) गाडी संख्या 51422  निझामाबाद ते पुणे सवारी गाडी – दिनांक 04.08.2018 ते 02.10.2018  दरम्यान रद्द

3) गाडी संख्या 51433  निझामाबाद ते पंढरपूर सवारी गाडी – दिनांक 03.08.2018 ते 01.10.2018  दरम्यान रद्द

4) गाडी संख्या 51434  पंढरपूर ते निझामाबाद सवारी गाडी – दिनांक 04.08.2018 ते 02.10.2018  दरम्यान रद्द

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

1) गाडी संख्या 57516 नांदेड ते दौंड सवारी गाडी दिनांक 1.08.2018 ते 29.09.2018 दरम्यान कोपरगाव ते दौंड दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

2) गाडी संख्या 57515 दौंड ते नांदेड सवारी गाडी दिनांक  02.08.2018 ते 30.09.2018 दरम्यान दौंड ते कोपरगाव दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

आदरणीय संपादक महोदयांना विनंती आहे कि हि बातमी आपल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी.

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail